1
सहभाग व एकांकिकेची पात्रताParticipation & eligibility
- परदेशस्थ (भारताव्यतिरिक्त) सर्व संस्था व नाट्यकर्मी “रंगसेतू” मध्ये सहभागी होऊ शकतात.All organisations and theatre artists based outside India can take part in “Rangasetu”.
- “रंगसेतू” मध्ये एकांकिकेचे सादरीकरण मराठी भाषेत असणे आवश्यक आहे.The play must be performed in Marathi.
- सादर करण्यात येणारी एकांकिका नाविन्यपूर्ण, आजच्या परदेशस्थ भारतीयांच्या जीवनाचे प्रतिबिंब दर्शवणारी असावी. तसेच ती या आधी रंगमंचीत झालेली नसावी.The play must be original and reflect the lives of Indians living abroad today. It must not have been staged before.
- एकांकिका एखाद्या कथा, कविता अथवा अन्य साहित्यकृतीवर आधारित असेल, तर मूळ लेखकाची किंवा संबंधित हक्कधारकाची आवश्यक परवानगी घेणे स्पर्धक संस्थेस बंधनकारक राहील. परवानगी घेण्याची संपूर्ण जबाबदारी स्पर्धक संस्थेची असेल. याबाबत ‘प्रयोग मालाड’ संस्थेची कोणतीही जबाबदारी अथवा बांधिलकी राहणार नाही.If the play is based on a story, poem or other literary work, the participating organisation must obtain the necessary permission from the original author or rights holder. The organisation is fully responsible for this; Prayog Malad bears no responsibility or obligation in the matter.
- लेखक आणि दिग्दर्शकाचे प्रतिज्ञापत्र / हमीपत्र आवश्यक आहे. (नमुना वेबसाइटवर भाग २ — “एकांकिकेची माहिती” मध्ये डाउनलोड करून, भरून, सही करून, स्कॅन करून तेथेच अपलोड करावा.)A writer and director undertaking / affidavit is required. (Download the format in Part 2 — “Ekankika details” — fill it in, sign it, scan it and upload it there.)
- “रंगसेतू” चे संपूर्ण वेळापत्रक वेळापत्रक पानावर (क्र. १४) दिले आहे.The full schedule is on the Timeline page (item 14).
