- मुख्यपृष्ठHome
- प्रश्नोत्तरेFAQ
प्रश्नोत्तरेFrequently asked questions
नियमावलीवर आधारित सामान्य प्रश्न व उत्तरे.Common questions, answered from the rules.
नोंदणी व शुल्कRegistration & fee
कोण सहभागी होऊ शकतो?Who can take part?
परदेशस्थ (भारताव्यतिरिक्त) सर्व संस्था व नाट्यकर्मी सहभागी होऊ शकतात. एकांकिकेचे सादरीकरण मराठी भाषेत असणे आवश्यक आहे.All organisations and theatre artists based outside India can take part. The play must be performed in Marathi.
प्रवेश शुल्क किती आहे व ते कसे भरायचे?How much is the entry fee and how do I pay?
शुल्क ₹२,०००/- (INR) आहे. ते स्पर्धक संस्थेच्या भारतीय प्रतिनिधीद्वारे QR Code स्कॅन करून किंवा Internet Banking द्वारे भरावे. परदेशी चलनात शुल्क स्वीकारले जाणार नाही.The fee is ₹2,000 (INR). Your organisation’s Indian representative pays it by scanning the QR code or via internet banking. Foreign currency is not accepted.
एकापेक्षा जास्त प्रवेश अर्ज देता येतील का?Can we submit more than one entry?
नाही. प्रत्येक स्पर्धक संस्थेस फक्त एकच प्रवेश अर्ज दाखल करता येईल.No. Each organisation can submit only one entry form.
सांकेतिक क्रमांक (Entry ID) म्हणजे काय?What is the Entry ID?
अर्ज स्वीकारल्यानंतर प्रत्येक संस्थेला एक युनिक कोड मिळतो. पुढील सर्व पत्रव्यवहारात, तसेच व्हिडिओ फाईलच्या नावात तोच वापरावा.After your application is accepted, your organisation receives a unique code. Use it in all further communication and in your video file name.
भरलेले शुल्क परत मिळेल का?Is the fee refundable?
नाही. एकदा भरलेल्या प्रवेश शुल्काचा कोणत्याही कारणास्तव परतावा दिला जाणार नाही.No. The entry fee is non-refundable for any reason.
एकांकिका व व्हिडिओPlay & video
एकांकिका किती वेळाची असावी?How long should the play be?
किमान ३५ मिनिटे व कमाल ४५ मिनिटे.Minimum 35 and maximum 45 minutes.
चित्रीकरण कसे करावे?How should we record it?
तीन कॅमेरा सेटअप वापरावा. प्राथमिक फेरीसाठी फक्त सेंटर कॅमेऱ्याची मास्टर फाईल, किमान 1080p मध्ये (सर्वोत्तम परिणामांसाठी आदर्श गुणवत्ता 4K — 3840 × 2160), सलग (No Cuts) व Re-take, Editing किंवा Dubbing शिवाय पाठवावी.Use a three-camera setup. For the preliminary round send only the centre-camera master file, at least 1080p (ideally 4K, 3840 × 2160, for best results), in one continuous take (no cuts) with no re-takes, editing or dubbing.
फाईलचे स्वरूप व नाव काय असावे?What file format and name?
एकच .mp4 किंवा .mov फाईल. नाव: “सांकेतिक क्रमांक_एकांकिकेचे नाव.mp4”, उदा. “१२३४_कळकीचे बाळ.mp4”.A single .mp4 or .mov file named “EntryID_PlayName.mp4”, e.g. “1234_Kalkiche Baal.mp4”.
व्हिडिओ पाठवल्यावर काय होते?What happens after we upload?
पोचपावती ई-मेलने मिळेल. नंतर आवाजाची स्पष्टता व चित्रीकरणाच्या दर्जाची तांत्रिक पूर्वचाचणी होईल व स्वीकृतीची पोचपावती चार दिवसांत ई-मेलने मिळेल.You receive an email acknowledgement. The play then goes through a technical pre-check (audio clarity, video quality) and acceptance is confirmed by email within four days.
आम्ही आमची एकांकिका स्वतः ऑनलाइन टाकू शकतो का?Can we post our play online ourselves?
स्पर्धेचा अंतिम निकाल जाहीर होईपर्यंत नाही; उल्लंघन केल्यास संस्था बाद होईल. त्यानंतरच्या १ महिन्यात ती समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करण्याचे अधिकार प्रयोग मालाडकडे असतील; त्या काळात संस्थाही ती प्रसिद्ध करू शकतात.Not until the final results are announced; violating this leads to disqualification. For the following month Prayog Malad holds the right to publish it on social media, and the organisation may publish it too during that month.
निवड व अंतिम फेरीSelection & finale
अंतिम फेरी कशी होईल?How does the final round work?
निवडलेल्या पाच एकांकिका नाट्यगृहात दाखवल्या जातील. उपस्थित मान्यवर परीक्षक प्रत्यक्ष परीक्षण करून निकाल जाहीर करतील.The five selected plays are screened in a theatre. Judges present evaluate them on the spot and announce the result.
अंतिम फेरीसाठी निवड झाल्यास काय पाठवावे लागेल?What do finalists need to send?
तीन कॅमेरा setup ने चित्रीकरण केलेली, संपूर्ण एडिट केलेली एकांकिका १५ फेब्रुवारी २०२७ पर्यंत.The fully edited, three-camera recording by 15 February 2027.
निवड झाल्यानंतर स्पर्धेतून माघार घेता येईल का?Can a finalist withdraw?
नाही. अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या संस्थेस कोणत्याही परिस्थितीत माघार घेता येणार नाही.No. A selected organisation cannot withdraw under any circumstances.
अजून प्रश्न आहे?Still have a question?
आम्हाला ई-मेल करा. कृपया तुमचा सांकेतिक क्रमांक (Entry ID) नमूद करा.Email us and please quote your Entry ID.
hello@rangasetu.com